व्वा क्या बात! अशीही राष्ट्रभक्ती ..! जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव मध्ये अंत्ययात्रा थांबवून झाले राष्ट्रगीत..!!

 
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काल, १७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सर्वत्र अकराच्या ठोक्याला राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव येथे अंत्ययात्रा थांबवून राष्ट्रगीत घेण्यात आले.
गावातील सामाजिक कार्यकर्त्या सुमन काशिनाथ बोरनारे यांचे ८४ व्या वर्षी काल निधन झाले. अंत्ययात्रा ग्रामपंचायत जवळ ११ वाजता पोहचली. राष्ट्रगीताची वेळ झाल्याने सुमन बोरनारे यांच्या नातेवाईकांनी व पाहुण्यांनी अंत्ययात्रा थांबवून राष्ट्रगीतासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. सुमन बोरनारे यांना देशाविषयी प्रचंड आदर होता. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला त्या न चुकता राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहायच्या. त्यामुळे काल गावकऱ्यांनी त्यांना काल अनोखी श्रद्धांजली वाहिली.