महिलेचा विनयभंग..! आरोपीची आई मुलाला म्हणे ओढ तिची साडी; खामगाव तालुक्यातील घटना

 
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ४२ वर्षीय विवाहितेचा घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विनयभंग केला. या कामात आरोपीला त्याच्या आईने देखील साथ दिली. काल, ६ एप्रिल रोजी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे हा प्रकार घडला. पीडित विवाहितेने खामगाव ग्रामीण पोलीस दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आई आणि मुलाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 खामगाव तालुक्यातील अटाळी येथील महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार  महिलेच्या घराशेजारील व्यक्तीने महिलेच्या जागेत वेल्डिंगचे   सामान ठेवले होते. या कारणावरून महिलेच्या पतीशी शेजाऱ्याने भांडण केले होते. ही जागा तुमची नाही मी कुणाच्याही जागेत सामान ठेवेल असे आरोपी महिलेला म्हणाला. यावेळी आरोपीची आई तिथे आली, तिने ओढ तिची साडी असे मुलाला सांगितले. तेव्हा आरोपीने महिलेचा पदर ओढला व तिला वाईट उद्देशाने जवळ ओढले अशा तक्रारीवरून आरोपी आई आणि मलाविरुद्ध विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान  आरोपीच्या ५० वर्षीय  आईने देखील याप्रकणात परस्परविरोधी तक्रार दिली असून तक्रारीवरून शेजारच्या महिलेच्या पतीने विनयभंग केल्याचा दावा केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी शेजारच्या महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.