खामगावच्या जांगीड ज्वेलर्समध्ये बुरखाधारी महिलेने केली चोरी!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोहन चौकातील जांगीड ज्वेलर्समध्ये आलेल्या बुरखाधारी महिलेने ५५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. ही घटना ८ फेब्रुवारीला दुपारी अडीचच्या सुमारास घडली. ९ फेब्रुवारीला दुकानमालकाने या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज प्रवीणकुमार जांगीड (३८, रा. रॅलीज प्लाॅट, बाळापूर फैल, खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. एक बुरखाधारी महिलेने दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात आली. तिने मंगळसूत्र दाखविण्याची मागणी केली. मंगळसूत्र दाखवले असता नजर चुकवून तिने मंगळसूत्र चोरले आणि तिथून निघून गेली. तिने चोरून नेलेले मंगळसूत्र ११.८० ग्रॅमचे (किंमत ५५ हजार )आहे. तपास नापोकाँ भानुदास तायडे करत आहेत.