खामगाव तालुक्यातल्या संभापूर वासियांनी काय पाप केलंय? त्यांच्या वाट्याला पहा काय आलय.! ग्रामपंचायतीचे हात वर..!

 
yugyu
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील संभापूर वासियांनी काही पाप तर केलं नाही ना असा सवाल सध्या ग्रामस्थांना पडलाय. त्याला कारणही तसेच असून त्यांना अतिशय दूषित पाणी पुरवठा होत असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

 गावातील सताड उघड्या असलेल्या नाल्या, त्यात साचलेली घाण, डुकरांचा गावातील मुक्त हैदोस, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा आजारांना निमंत्रण देत आहेत. लिकेज पाइपलाइन मुळे ही सगळी घाण त्या पाइपलाइन मधून नागरिकांच्या घरात जात असल्याने दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.