खामगावमध्ये अतिक्रमणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी!; ६ जणांविरुद्ध गुन्हा
Mar 4, 2022, 20:40 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिक्रमणाच्या जागेवरून वाद होऊन दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. काल, ३ मार्चला संध्याकाळी खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात ही घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रियाजुनबी एजाज बेग (३५) यांनी तक्रार दिली, की त्यांच्या घरासमोर येऊन इम्रान खा रशीद खा (२४), मोशिन खा रशीद खा (२१), रशीद खा मुन्सी खा (५५) व अल्पवयीन मुलगा यांनी वाद घातला व त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. यात त्यांचे पती एजाज बेग यांचे डोके फुटले. तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या गटातील मोसीन खान (२०) याने तक्रार दिली की, जागेच्या मुद्द्यावरून एजाज बेग मनवर बेग व रियाजुनबी एजाज बेग यांनी त्याला मारहाण केली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघा पती- पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.