दोन ट्रकची समोरासमोर धडक; १ जण ठार! नांदुरा तालुक्यातील घटना
Apr 15, 2022, 16:40 IST
नांदुरा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एक ट्रकचालक जागीच ठार झाला. मलकापूर नांदुरा रस्त्यावर आज ,१५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर नांदुरा रस्त्यावर वडनेर भोलजी जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रकचालक मोहम्मद सत्तार शेख (४३) हा जागीच ठार झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदुरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.