दोन ट्रकची समोरासमोर धडक!; चालक ठार,एक गंभीर; नांदुरा तालुक्यातील घटना

 
4erytu
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ट्रकचालक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. काल, ४ मे रोजी सायंकाळी  ५ वाजेच्या सुमारास नांदुरा मलकापूर रस्त्यावर  नांदुऱ्याजवळ हा अपघात झाला.
 ट्रक क्रमांक ( एच.आर ६६, ए ४४०३) नांदुऱ्यावरून मलकापुरकडे जात होता तर ट्रक क्रमांक ( आर.जे ०९, जीसी ६२३३)  मलकापुरवरून नांदुऱ्याकडे येत होता. दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने नांदुऱ्यावरून मलकापुरकडे जाणाऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अपघातात ठार झालेल्या चालकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले तर जखमीला उपचारासाठी हलविण्यात आले. पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.