शिक्षिकेला भाऊबीज पडली एक लाखाला.!वाचा खामगावात काय घडलं!

 
khamgao
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या शिक्षिकेने खामगावच्या एका ज्वेलरीच्या दुकानात पॉलिश करण्यासाठी आणलेल्या बांगड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. 

देऊळगाव राजा येथील शिक्षिका सौ. नलिनी जगन्नाथ कायंदे (४७)  ह्या भाऊबीजेसाठी माहेरी वडिलांकडे खामगावच्या केला नगर येथे आल्या होत्या. २८ आक्टोबर रोजी दुपारी नवलचंद मिठूलाल यांच्या ज्वेलरीच्या दुकानात त्या आपल्या सोन्याच्या बांगड्या (किंमत १ लाख रुपये) ह्या पॉलिस करण्याकरता घेवून गेल्या होत्या. दुकानदाराला त्या बांगड्या दाखवण्यासाठी दुकानातील काउंटरजवळ त्या उभ्या असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधून अलगत  बांगड्या लंपास केल्या आहेत. काही वेळाने ही घटना समजल्यावर सौ.नलिनी कायंदे यांनी तशी तक्रार खामगाव शहर पोलिसात दिली आहे. विशेष म्हणजे ज्वेलरीच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे.