अनुसूचित जातीच्या बांधवांना मिळालेल्या जमिनी माफियांनी हडपल्या?; खामगावच्या पारखेडमध्ये भूखंड घोटाळ्याचा आरोप

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उदरनिर्वाहासाठी तत्‍कालिन तहसीलदारांनी अनुसूचित जातीच्या बांधवांना दिलेल्या जमिनी माफियांनी गिळल्याचे पारखेड (ता. खामगाव) येथे समोर आले आहे. जमीन हस्तांतरणास बंदी होती. तरीही अनेकांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलून जमिनी खरेदी करून पट्टेधारकांची दिशाभूल केल्याचा आरोप आज, २४ मार्चला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करणाऱ्यांनी केला.
उपविभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदनही दिले. पुन्हा भूमीहिन झाल्यामुळे काही पट्टेधारकांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्‍महत्‍या केल्याचे वास्तवही यावेळी आंदोलकांनी मांडले. लक्ष्मण सनान्से यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. उच्‍चस्तरीय चौकशी करून जमिनी पुन्हा भूमिहिनांना परत मिळवून द्याव्यात, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. भगवान ढगे, लक्ष्मीबाई  बांगर, रामदास ढगे, भीमराव बांगर, श्रीकृष्ण  खदान, सुभद्राबाई  डोलारे, जनाबाई  खरात, सुंदराबाई खरात, संजय भिडे, सुपडाबाई  भिडे, सरुबाई बोदडे यांच्यासह अन्य भूमिहिनांच्या निवेदनावर सह्या आहेत.