तेजस्वी महाराजांच्या पालखीचे चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने जंगी स्वागत! आज खामगावात मुक्काम! उद्या शेगावच्या दिशेने रवाना! २१ वर्षांची परंपरा

 

खामगाव ( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या २१ वर्षांपासून वरोडी तालुका सिंदखेड राजा येथील तेजस्वी महाराजांचा पालखी सोहळा हा ५ ऑगस्ट रोजी,वरोडी येथून श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असतो. यामध्ये दरवर्षी हजारो वारकऱ्यांचा सहभाग मोठ्या उत्साहात असतो. यावर्षीही ११ शेहून अधिक वारकरी यामध्ये सहभागी आहेत. यासह ५० पेक्षा अधिक वाहनांचा ताफा, एक अंबुलन्स या पालखी सोहळा सोबत आहे. 

काल दिनांक ८ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र अटाळी येथे भोजने महाराज संस्थान या ठिकाणी पालखीचा रात्री मुक्काम होता. आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता, रामनगर येथील चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शाळेच्या वतीने पालखीचे उत्साहत स्वागत करण्यात आले.

यावेळी याठिकाणी हजारो वारकरी व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आज रात्रीचा मुक्काम खामगाव येथील कॉटन मार्केट मध्ये आहे. उद्या १० ऑगस्टला श्रीक्षेत्र शेगावच्या दिशेने पालखी रवाना होणार आहे.