शासनाच्या नवीन पेन्शन योजनेची शिक्षकांनीच पेटवली होळी; खामगाव तालुक्यातील प्रकार

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने सुरू केलेली नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून दुर्दैवी आहे, असा आरोप करत खामगाव तालुक्यातील  बोरी आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शासनाच्या नवीन पेन्शन योजनेची होळी करण्यात आली.
होळीच्या दिवशीच जिल्हा परिषद शाळेत पेटलेल्या या होळीची सध्या चर्चा आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करत नव्या पेन्शन योजनेचा यावेळी निषेध करण्यात आला. या वेळी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सिताराम पांढरे, शिक्षक सेना संपर्कप्रमुख काशिराम वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक दिनेश चोपडे, संजीव नागरीक, सुवर्णा वाणी, मनिषा होगे, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.