तलफ... शेगावमध्ये दोन पानटपऱ्या फोडल्या!; आनंद सागरसमोरील घटना

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील आनंद सागरसमोर चोरट्यांनी दोन पानटपऱ्या फोडल्या. सिगारेटच्या पाकिटांसह रोख रक्‍कम असा एकूण ७ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल गायब केला आहे. ही घटना २३ एप्रिलला सकाळी दहाच्या सुमारास समोर आली.

गजानन जगन्‍नाथ वाघ (३६, रा. दसरानगर, शेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते आनंद सागरसमोर १०-१२ वर्षांपासून जय गजानन पान सेंटर व टी स्टाॅल चालवतात. त्‍यांच्या दुकानाशेजारी योगेश गजानन हिवरे (रा. दसरानगर, शेगाव) यांचे मराठा पान सेंटर आहे. २३ एप्रिलला दुकान उघडण्यासाठी गेले असता त्‍यांना त्‍यांचे दुकान व हिवरे यांचे दुकान चोरट्यांनी फोडलेले दिसले.

त्‍यांच्या दुकानातून सिगारेटची ३ पाकिटे स्टीलच्या पाण्याच्या दोन कोठ्या, चहा बनविण्याचे भांडे, चहाची किटली, चहा घोटण्याचा एक चमचा, दोन मग असा एकूण २ हजार ६९५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेलेल्याचे दिसून आले. मराठा पान सेंटरमधून गल्ल्यातील ७०० रुपये रोख, सिगारेटची २५ पाकिटे असा एकूण ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले. तपास पोहेकाँ गजानन वाघमारे करत आहेत.