अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर कोसळले! सुदैवाने जीव वाचला
Sep 1, 2022, 19:40 IST
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या पंधरा दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने कालपासून जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावली. यामुळे बहुतांश शेतकरी आनंदात असले तरी खामगाव तालुक्यातील अटाळी येथील एक अल्पभूधारक शेतकरी मात्र कालच्या पावसामुळे रस्त्यावर आलाय. शेतकऱ्याचे राहते घर कोसळल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अटाळी येथील परशराम सुखदेव पांडे (४०) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गावात प्तनी व दोन मुलासोंबत राहतात. काल झालेल्या मुसळधार पावसाने रात्री ९ च्या सुमारास कोसळले. घरातील सर्वजण दुसऱ्या खोलीत असल्याने त्यांचा जीव वाचला. पांडे यांना शासनाने लवकर मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.