११ ते १३ एप्रिलदरम्‍यान शेगावचे श्रींचे मंदिर राहणार बंद, १४ तारखेनंतर विना ई-पास घेऊ शकाल दर्शन

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  राज्‍य शासन आणि त्‍यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी धार्मिक स्थळे पूर्ण क्षमतेने पूर्ववत खुले करण्याचे निर्देश दिल्याने शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरातही १४ एप्रिलपासून भाविकांना आता ई-पास विना दर्शन घेता येणार आहे.
१० एप्रिलपर्यंत ई- दर्शन पास वितरित झालेल्या असल्याने त्‍यांचे दर्शन त्‍याच पद्धतीने कायम राहील. त्‍यानंतर दर्शन व्यवस्‍था पूर्ववत करण्यासाठी मंदिर ११ ते १३ एप्रिलदरम्‍यान बंद राहणार आहे. १४ एप्रिलपासून श्रींचे दर्शन नित्‍याप्रमाणे घेता येईल. दरम्‍यान, २ ते १० एप्रिल दरम्‍यान मंदिरात श्रीरामनवमी उत्‍सव साजरा होत अाहे. मात्र हा उत्‍सवसुद्धा मर्यादित स्वरुपातच साजरा केला जाणार आहे. त्‍यामुळे भाविकांनी गर्दी करू नये. या काळात भक्‍तनिवास आणि सोयी सुविधा नित्‍याप्रमाणे सुरू राहतील, असे संस्थानच्या व्यवस्‍थापकीय विश्वस्तांनी कळवले आहे.