श्रींचा प्रगट दिन महोत्सव कोरोनामुळे यंदाही मर्यादित स्वरुपात
Feb 19, 2022, 12:09 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव यंदाही मर्यादित स्वरुपातच साजरा होणार आहे. कोरोनामुळे शासनाने निर्बंध आणल्याने १७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान महोत्सव काळातही ई-दर्शन पासद्वारेच भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
भाविकांसाठी भोजनप्रसादाची व्यवस्था संस्थानने केली असून, निवास व्यवस्थाही नियमानुसार उपलब्ध राहील. याची भाविक व वारकरी मंडळींनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानने केले आहे.