सरसंघचालक मोहनजी भागवत जिल्ह्यात! पहा कसे झाले स्वागत

 
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पु. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आज, ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठला शेगाव येथे आगमन झाले. यावेळी श्री .संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

सकाळी साडेआठला सरसंघचालक मोहनजी भागवत श्री संत गजानन महाराज मंदिरात दाखल झाले. यावेळी आज सोनियाचा दिनु..या अभगांच्या गजरात संस्थांनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर मोहनजी यांनी कर्मयोगी  स्व. शिवशंकरजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक गणेशजी शेटे, प्रांत सह प्रचारक परिक्षीतजी जावळे, विभाग प्रचारक स्वप्नील जी राऊत, विभाग कार्यवाह विजय पुंडे जी उपस्थित होते. या भेटीनंतर सकाळी १० वाजता मोहनजी नागपूर कडे रवाना झाले.