विहिगावात निसर्गदरम्य वातावरण सुरू आहे रामकथा सोहळा

 
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिगाव (ता. खामगाव) येथे मस प्रकल्पाच्या शेजारी तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेल्या शिव व नाना महाराज मंदिरात २३ फेब्रुवारीपासून श्री रामकथा सोहळा सुरू आहे. १ मार्चपर्यंत हा सोहळा सुरू असून, सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आहे.
सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमासह महाराष्ट्रभरातील गाजलेल्या कीर्तनकारांची श्री हरी कीर्तनाची सेवा रोज रात्री ८ ते रात्री १० पर्यंत होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर लगर यांच्या पुढाकाराने हा सोहळा होत आहे. सांगता २ मार्चला होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.