अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तात्काळ पंचनामे करा! ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना मदत करा; शेगावच्या तहसीलदारांना शिवसेनेचे निवेदन

 
rdyty
शेगाव( संतोष देठे पाटील;बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेगाव तालुक्यातील मनसगाव मंडळात यंदा  अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. या संकटात शासनाने संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभे राहत तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख व शेतकऱ्यांनी शेगावच्या तहसीलदारांकडे केली आहे.

शेगाव तालुक्यातील खातखेडचे सरपंच तथा शिवसेना तालुकाप्रमुख रामेश्वर गजानन थारकर यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनसगाव मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने बोंडगाव, खातखेड तसेच संपूर्ण मनसगाव मंडळातील शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे.

तसेच ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यांना तात्काळ सानुग्रह मदत देण्यात यावी. निवेदनावर संतोष रंगारे, अनिल उन्हाळे, उमेश उन्हाळे, गजेंद्र सरोकार, महादेव उन्हाळे, सोपान उन्हाळे, धनंजय देवचे ,प्रतीक उन्हाळे, साहेबराव बोंद्रे, संदीप गूळभेले, संतोष गूळभेले, गोपाल बोंद्रे, नितीन अगळजे, पंकज इलामे, रघुनाथ अगळजे, मंगेश इलामे, आकाश अंदुरकार यांच्या सह्या आहेत.