१५ आणि१६ ऑक्टोबरला नरेंद्राचार्य महाराज शेगावात!
Oct 11, 2022, 09:19 IST
शेगाव(संतोष देठे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत नरेंद्राचार्य महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन १५ व १६ ऑक्टोबर रोजी शेगावात करण्यात आले आहे.
शेगाव येथील श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय एम.एस. ई.बी चौक खामगाव रोड, संतनगरी येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक सुरेश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.