वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या!; खामगाव तालुक्यातील घटना

 
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ६८ वर्षीय वृद्धाने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. खामगाव तालुक्यातील जनुना येथे आज, २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम ज्ञानदेव कोळसे ( रा.जनुना, ता. खामगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

मृतक सखाराम कोळसे यांचा मुलगा शिवाजी कोळसे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, सखाराम कोळसे यांनी काल रात्री १० पर्यंत टिव्ही पाहिली. घरातील इतर सदस्य  झोपल्यानंतर त्यांनी खोलीच्या छताच्या लाकडी बल्लीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घरातील सदस्य उठल्यानंतर सकाळी ही घटना उघडकीस आली.

माहिती मिळताच खामगावच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी शिवाजीनगर  पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे नापोकॉ राठोड करीत आहेत.