कामावर गेलेले निसारभाई घरी परतलेच नाही ! २४ दिवस उलटल्याने वरवट बकाल निवासी कुटुंबाला लागलाय घोर ; दोनेक दिवस लागला पण नंतर मोबाईलही 'नॉट रीचेबल' !!

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   रोजच्या प्रमाणे मिस्त्री कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला घरातील कर्ता पुरुष महिना उलटायला आला तरी घरी न परतल्याने वरवट बकाल( ता. संग्रामपूर)येथील शेख कुटुंबीय हवालदिल झाले आहे. काही दिवस लागणारा मोबाईल लगेच नॉट रीचेबल झाल्याने ते चिंताग्रस्त झाले आहे.
 

तालुक्यातील वरवट बकाल येथील शेख निसार शेख ईमाम मिस्त्री २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घरातील मंडळीना मुंडगावला मिस्री कामासाठी जात असल्याचे सांगुण घराबाहेर पडले. मात्र त्याच दिवशी नेहमीप्रमाणे संध्याकाळी परतले नाही. एवढेच काय आज  २४ दिवस उलटुनही  घरी परतलेच नसल्याने  त्याचे वडिल मनोरुग्णा सारखे वागत असुन आजारी पडले.  तसेच संपुर्ण कुटुंब अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला लहान भाऊने  त्यांच्याशी दुरध्वनी व्दारे संपर्क केले असता मी शेगावला गवंडी काम करण्यासाठी आलो असे निसारभाई यांनी सांगितले.   ठिक ठिकाणी व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मिळून न आल्याने आणि फोन सुद्धा  बंद असल्याने त्याचा लहान भाऊ शेख शरिफ शेख इमाम यांनी लेखी तक्रारी  केल्यावर तामगाव पोलीसांनी मिसिंगची नोंद घेतली.  

संपर्काचे पोलिसांचे आवाहन..

 दरम्यान बेपत्ता इसमाचे ५ फुट उंची , रंग गोरा,  दाढी , डोक्यात गोल टोपी घालण्याची सवय , अंगात पिवळा शर्ट व काळी पॅन्ट घातलेली,  हिंन्दी मराठी भाषा बोलता येते असे वर्णन आहे. उपरोक्त वर्णन असलेली व्यक्ती आपल्या परिसरात दिसल्यास तामगाव पोस्टेचे ठाणेदार उलेमाले यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.