शेगावमध्ये २८, २९ एप्रिलला नरेंद्राचार्य महाराज येणार!

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिण पीठ नानिजधाम) यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन २८ व २९ एप्रिलला शेगावमध्ये केले आहे.
खामगाव रोडवरील पुरुषोत्तम हरी पाटीलनगरातील श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालयात सकाळी ९ पासून हा सोहळा सुरू होईल, अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठाचे प्रमुख कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक सुरेश मोरे व पीठ समिती सदस्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. भाविकांसाठी दोन्ही दिवस महाप्रसादाचीही व्यवस्था केली आहे. भाविकां कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.