महावितरण संकटात; ग्राहकांनो बिल भरा!; ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे खामगावमध्ये आवाहन
महापारेषणच्या २२० के.व्ही. धरणगाव (ता. मलकापूर) वीज उपकेंद्राचे लोकार्पण आणि महावितरणच्या ३३/११ के. व्ही. मनसगाव (ता. शेगाव) येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनीषा पवार, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीप सानंदा, राहुल बोंद्रे, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता भीमराव राऊत, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. आकोडे आदी उपस्थित होते.
मंत्री राऊत म्हणाले, की महावितरणला देखील बाहेरून पैसे देऊन वीज खरेदी करावी लागते. महापारेषण व महावितरणचे नवीन वीज उपकेंद्र झाल्याने जिल्ह्यातील सुमारे पाच हजार वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. शेतकरी बांधवांना दर्जेदार आणि खात्रीशीर वीज पुरवठा यामुळे मिळणार आहे. या वीज उपकेंद्राच्या उभारणीवर १४४ कोटी रुपये खर्च झाले आहे. यात १ हजार एमव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र लावले आहेत. यावेळी महापारेषण, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.