कोराडी प्रकल्प ओवरफ्लो! अनेक गावांत रेड अलर्ट!!
Jul 14, 2022, 20:48 IST
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून सध्या धरणातून विसर्ग वाहत आहे. यामुळे परिसरातील गावांना धोक्याचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोराडी हा जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात हाऊस फुल्ल होणारा जिह्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. आज 14 जुलैला पहाटे 5 वाजता हा प्रकल्प 100 टक्के भरला. यात दिवसभर भर पडल्याने त्याची जलपातळी आणखी वाढली आहे. धरण क्षेत्रात गत 24 तासात 55 तर आजवर एकूण 434 मिमी इतका धोधो पाऊस झालाय.