तो कुणीही असुदेत, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही! जलंब पोलीस ठाण्याच्या शांतता समितीच्या बैठकीत एसडीपीओंचे प्रतिपादन
Sep 6, 2022, 16:01 IST
जलंब( संतोष देठे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणारा कुणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. सगळे सण उत्सव शांततेत पार पाडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन खामगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी जलंब पोलीस स्टेशनच्या शांतता समितीच्या बैठकीत केले.
या बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी श्री घोगटे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. भापकर यांच्यासह पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांचे पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक ठाणेदार धीरज बांडे यांनी केले. या सभेत सेवानिवृत्त झालेले पोलीस पाटील श्री. आखरे यांचा सत्कार करण्यात आला.