फेसबुकवर छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक पोस्ट; धामणगाव बढेच्या नोमान रशीद विरुद्ध गुन्हा दाखल

 
मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): फेसबुक वर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नोमान रशीद पटेल विरुद्ध धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेच्या मोताळा तालुका प्रमुखांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
 शिवसेनेचे मोताळा तालुका प्रमुख  रामदास भगवान चौथनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धामणगाव बढे येथील  नोमान रशीद पटेल याने त्याच्या फेसबुक स्टेटसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फुली मारलेला फोटो अपलोड केला व त्यावर मिया भाई का पावर असे कॅप्शन दिले. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचे चौथनकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून नोमान रशीद पटेल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास धामणगाव बढे पोलीस करीत आहेत