जळगाव जामोद मध्ये राज ठाकरेंच्या 'त्या" वक्त्यव्याचा माळी महासंघाने केला निषेध! छत्रपती शिवरायांच्या समाधीबद्दल केले होते विधान

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बांधली असे वक्तव्य केले होते. राज ठाकरेंचे हे विधान  वास्तव झाकून ठेवणारे  असल्याचा आरोप करीत जळगाव जामोद मध्ये माळी महासंघाने  त्यांच्या या वक्तव्याबद्दल निषेध केला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८६९ मध्ये शोधून काढली . शिवाजी महाराजांची पहिली जयंती १९ फेब्रुवारी १८७०  रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनीच केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा हा ज्योतिराव फुले यांनीच लिहिला असे वास्तव असताना राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बांधली असे वक्तव्य करणे हे वास्तवतेपासून विसंगत असल्याने माळी महासंघाने  म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

लोकमान्य टिळक यांनी भारताला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची जी चळवळ चालविली त्याचा माळी महासंघाला निश्चित आदर आहे मात्र  राज ठाकरे यांनी केलेले चुकीचे वक्तव्य निषेधार्ह असल्याने माळी महासंघाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. माळी महासंघाच्या राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारणी सभा जळगाव जामोद येथे पार पडली . या सभेत  या वक्तव्याचा निषेध करण्यात येऊन राज ठाकरे यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करावी असा ठराव संमत करण्यात आला.या सभेला माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे,

राष्ट्रीय महासचिव रवींद्र अंबाडकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे,उपाध्यक्ष काळूराम गायकवाड,राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रा.नानासाहेब कांडलकर,राष्ट्रीय सचिव कैलास महाजन,संतोष जमदाडे व भारत माळी,राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष वनिता लोंढे व प्रदेश महिला अध्यक्ष शुभांगी लोंढे,प्रदेश उपाध्यक्ष हिरामण भुजबळ व प्राचार्य डॉ.नामदेवराव कोकोडे,प्रदेश कोषाध्यक्ष श्रीकृष्ण गोरडे,वैद्यकीय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संजय घाटे, प्राध्यापक आघाडी अध्यक्ष प्रमोद तांबे,युवक प्रदेश आघाडी अध्यक्ष शरद पेठकर, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर,कार्याध्यक्ष मुकुंदराव पोटदुखे, विभागीय अध्यक्ष राजेश जावरकर,दिनेश टाकरखेडे,अतुल क्षीरसागर,कार्याध्यक्ष अनिल भगत,उपाध्यक्ष डॉ.भास्करराव चरखे यांची  उपस्थिती होती.