झोपडीला आग! गाईचा होरपळून मृत्यू; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान; मलकापूर तालुक्यातील घटना
Apr 16, 2022, 16:10 IST
मलकापूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्याचा झोपडीला अचानक आग लागल्याने गाईचा व पाळीव कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय अन्य महत्वाचे शेती अवजारे जळून खाक झाले. मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे काल, १५ एप्रिलच्या दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नरवेल येथील नारायण हरी भारंबे यांच्या यांच्या झोपडीला अचानक आग लागली. झोपडीत गाय ,वासरू आणि पाळीव कुत्रा बांधलेला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून भारंबे यांनी वासराची सुटका केली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने गाय आणि पाळीव कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय झोपडीतील भांडे, स्प्रिंकलर सेट, पीव्हीसी पाईप चा सट, कुटार जळून खाक झाले.
गावातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. तलाठी सविता जगताप यांनी पंचनामा करून अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.