मोताळा तालुक्यातील "या" दहा गावांसाठी GOOD NEWS! दिशा बचतगट फेडरेशनच्या लालमाती शाखेचा आज शुभारंभ! मा. उपजिल्हाधिकारी सुनील शेळके करणार उदघाटन

 
jhgyh
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन तथा महिला अर्बन को-ऑप-क्रेडीट सोसायटीच्या लालमाती येथील शाखेचा शुभारंभ आज ७ नोव्हेंबरला  दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. किन्होळा, पान्हेरा, खेडी, कोऱ्हाळा बाजार, कुऱ्हा, गोतमारा, हनवतखेड, थळ, तपोवन, पोखरी आदी दहा गावे या शाखेशी संलग्न असणार आहेत. 

thakre

      ( जाहिरात👆🏻 )

या कार्यक्रमाचे उदघाटन मा. उपजिल्हाधिकारी तथा अभिता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शेळके करणार आहेत. तर  अध्यक्षस्थानी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके राहणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुखत्यारसिंग मोरे, पंचायत समितीचे मा. सभापती उत्तमराव वैराळकर, पान्हेरा ग्रामीणचे संस्थापक अध्यक्ष दशरथ तायडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर सहकारी सुतगिरणी मलकपूरचे मा. संचालक एकनाथ पाटील, मोताळा पंचायत समितीचे मा. सभापती कैलास गवई, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, महिला काँग्रेस कमेटीच्या मा. तालुकाध्यक्ष नीताताई पाटील, मा. जि.प. सदस्या उज्वलताई मोरे, मा. सभापती कुसुमताई एंडोले, गोतमारा- हनवतखेडचे सरपंच विनोद राठोड, रोहिणखेड- थळचे सरपंच डॉ. भानुदास हुंबड, कोऱ्हाळा बाजारचे सरपंच श्रीकृष्ण सोनोने, खेडीच्या सरपंच ज्योतीताई मोरे, पान्हेराच्या सरपंच किरणताई काटकर, तपोवन- पोखरी- काळेगावच्या सरपंच लक्ष्मीताई पाटील, कुऱ्हाच्या सरपंच वर्षाताई घोती, किन्होळा सरपंच पद्माबाई गवई, 
खेडीचे मा. सरपंच दरबारसिंग मोरे, सुनील पाटील, प्रकाश राठोड, शिवदास महाराज राहणे, राजेंद्र जंगले, सुभाष वैराळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

परिसरातील नागरिकांनी या  कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित  राहण्याचे आवाहन दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन तथा दिशा महिला अर्बनच्या अध्यक्षा सविताताई डुकरे, उपाध्यक्ष चंद्रकला नारखेडे, संचालिका प्रियंका राठोड, स्नेहल नेवरे, शगुप्ता शाहीन काझी, सविता किटे, रजनी शेळके, सुरेखा एंडोले, सुनंदा जैन, बेबी पवार, राधाबाई हिवाळे यांनी केले आहे.