माजी आमदार सानंदांना धोबीपछाड देत आ. फुंडकरांचा वरचष्मा!; खामगाव खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलला बहुमत!!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार ॲड. आकाश फुंडकर यांचा वरचष्मा दिसून आला आहे.  भाजपा समर्थित पॅनलने दणदणीत विजय मिळवत १४ पैकी ९ जागा पटकावल्या आहेत. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व विद्यमान अध्यक्ष बाबुरावशेठ लोखंडकार यांच्या पॅनलने वैयक्‍तीक मतदारसंघातील सर्वच ८ जागा जिंकल्या, तर सोसायटी मतदारसंघातील ६ पैकी एक जागा मिळवून निवडणुकीत बहुमत प्राप्त केले आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्त्वाखालील पाच पक्षांच्या महाविकास आघाडीला ५ जागा मिळाल्या आहेत.

खरेदी विक्री संघाच्या १४ जागांसाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक झाली होती. १२ फेब्रुवारीला सकाळी ११ पासून जिल्हा परिषद शाळेत मतमोजणी झाली. हा विजय शेतकऱ्यांचा असल्याची प्रतिक्रिया आमदार आकाश फुंडकर यांनी दिली, तर निवडणुकीत धनशक्‍तीचा वापर झाल्याने महाविकास आघाडीला फटका बसल्याचे दिलीपकुमार सानंदा म्‍हणाले.

विजयी झालेले उमेदवार असे

  • भाजप समर्थित पॅनेल ः शिवशंकर बाबुरावशेठ लोखंडकार, गजानन अरवाडे, विलाससिंह वाघ, गजानन पानझाडे, सौ. प्रमिला बळीराम वानखेडे, आनंदाराव हगारे, नीताताई भागवत ठाकरे, गोदावरीताई ढोण, प्रमोद काशिनाथ बेलोकार.
  • महाविकास आघाडी ः गणेश माने, अशोकराव हटकर, गोपाळराव चव्हाण, राजेंद्रसिंह इंगळे, पांडुरंग राखोंडे.