दोन आगलाव्यांना वनविभागाने पकडले! सातपुड्यातील ३१६ हेक्टरवरील जंगलाची केली होती राखरांगोळी

 
987678
संग्रामपूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सातपुड्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पा अंतर्गत  येणाऱ्या अंबाबरवा आणि वाण अभयारण्यात ३ व ४ एप्रिल ला भिषण वनवा पेटला होता . या आगीत  ३१६ हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली होती .   जंगलाला आग लावून अवैधरित्या सालाई गोंद काढणारे २ आगलावे  अखेर वन्यजीव विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत . 
 गंगाराम थानसिंग नरगावे  (२४) व रुफानसिंग गुमानसिंग नरगावे  (३४, दोघे रा. रोहिणखिडकी ता . संग्रामपूर) अशी अटक करण्यात आलेल्या वनतस्करांची नावे आहेत.  त्यांच्याविरुद्ध  भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दोन्ही आरोपींना संग्रामपूर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे .