सासऱ्याची नवविवाहित सुनेवर वाईट नजर, ती स्वयंपाक करायची तेव्हा.... सुनेची पोलिसांत तक्रार; मोताळा तालुक्यातील घटना

 
45
मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नुकतेच लग्न झालेल्या नवविवाहित सुनेवर सासऱ्याची वाईट नजर होती. ती स्वयंपाक करायची तेव्हा सासरा तिच्याजवळ जायचा आणि वाईट नजरेने पहायचा. पती,सासू, दिर सगळेच तिचा क्षुल्लक कारणावरून छळ करायचे. छळाला कंटाळून तिने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आज,१९ एप्रिलला ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथे माहेरी गेलेल्या २० वर्षीय विवाहितेने याप्रकरणाची तक्रार दिली. तिचा विवाह बुलडाणा शहराला लागून असलेल्या माळविहीर येथील एका तरुणाशी  ३० जून २०२० ला झाला होता. लग्नात तिच्या वडिलांनी पावणे तीन लाख रुपयांचा खर्च केला होता.लग्नानंतर सासरी गेल्यावर सुरुवातीपासूनच तिचा छळ करण्यात येत होता. तू गरीबाची मुलगी आहे,आमच्या श्रीमंताच्या घरात शोभत नाही असे टोमणे सासरचे देत  होते असे तिने तक्रारीत म्हटले होते.

तिच्या सासरच्याची तिच्यावर वाईट नजर होती. मी जसे सांगेल तसे तुला वागावे लागेल असे सासरा म्हणत होता. तिने सासऱ्याच्या करामती पतीला सांगितल्या मात्र पती उलट तिलाच दोष होता. त्यामुळे सासऱ्याची हिम्मत वाढली. ती स्वयंपाक करताना सासरा तिच्याजवळ जाऊन बसायचा तिच्याकडे वाईट नजरेने पहायचा. तुझ्या आईवडिलांना हे सांगितल्यास खल्लास करून टाकीन अशी धमकी द्यायचा.

तिचे दोन्ही दिर सुद्धा तिचा छळ करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. फोर व्हिलर घेण्यासाठी माहेरवरून ५ लाख रुपये आण असा तगादा सासरच्यांनी तिच्याकडे लावला. १६ नोव्हेंबर २०२१ ला सासरच्यांनी बेदम मारहाण करून तिला घराबाहेर हाकलले. तेव्हापासून ती माहेरी राहते. तिला अजूनही सासरचे लोक नांदविण्यासाठी घेऊन गेले नसल्याने तिने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेचा पती, सासरा ,सासू, आणि दोन दिरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.