या पोरांना घेऊन जात तरी कोण अन् कशासाठी? आता मोताळा तालुक्यातील कोथळीचा नंबर; अल्पवयीन मुलाचे अपहरण! आई - वडील शोधून शोधून थकले

 
kidnyap
मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लहान मुले पळवणारी टोळी असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी ही चर्चा म्हणजे अफवा असून अशी कोणतीही टोळी नसल्याचे पोलीस सांगत असले तरी जिल्ह्यातून अपहरणाच्या घटना मात्र कमी होताना दिसत नाही. मोताळा तालुक्यातील कोथळी येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोराखेडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख समीर शेख सादिक(१५) असे  अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. १५ सप्टेंबर पासून तो गायब आहे. १५ तारखेला दुपारी  तो वाघजाळ रोडवर एका जणाच्या दुचाकीवर मोताळ्याकडे जातांना दिसला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नसल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय समीरच्या वडिलांना आहे. सडपातळ बांध्याच्या, सावळा रंग असलेल्या व ५ फूट उंचीच्या समीरचे अपहरण कुणी केले असेल याचा शोध पोलीस घेत आहेत.