हर हर महादेवच्या गजरात दुमदुमली किन्ही महादेव नगरी; शेकडो भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन

 
खामगाव (भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे राज्यभर सर्व यात्रा उत्सव बंद होते. त्यामुळे  खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथे दरवर्षी भरणारी यात्रासुद्धा दोन वर्षांपासून बंद होती. मात्र आता निर्बंधमुक्ती  झाल्यामुळे यावर्षी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
 यामुळे खामगाव तालुक्यातील हजारो भाविकांनी किन्ही महादेव येथे उपस्थित राहून आज, १३ एप्रिल ला महादेवाचे दर्शन घेतले.किन्ही महादेव येथील हे मंदिर पुरातन असून शिवकालीन आहे.  या ठिकाणी दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमी आणि चैत्र शुद्ध द्वादशी (आमली बारस) ला श्री महादेवाची भव्य यात्रा दरवर्षी भरत असते.