डॉ. स्वातीताई वाकेकरांनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली भाऊबीज! म्हणाल्या, हक्काच्या बहिणीला कधीही आवाज द्या, तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर

 
संग्रामपूर( ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर  काम करण्याच्या आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने परिचित आहेत. यंदाची भाऊबीज सुद्धा स्वातीताईंनी आदिवासी बांधवांसोबत साजरी केली. सातपुड्याच्या कुशीत असलेला आदिवासी समाज हा कष्टकरी समाज आहे. श्रमातून वेळ काढून आदिवासी बांधव सर्व धार्मिक सण पारंपरिक पद्धतीने साजरा करता. अशा आदिवासी श्रमिकांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण फुलवणे हे माझे भाग्य समजते असे भावोद्गार यावेळी डॉ. स्वातीताईंनी काढले.

काल, २७ ऑक्टोबरला संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव  डॉ. स्वातीताईंनी आदिवासी बांधवांसोबत भाऊबीज साजरी केली. दरवर्षी त्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. त्या गावात पोहचताच आदिवासी बांधवांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. यावेळी आदिवासी बांधवांना शेला, टोपी, नारळ व फराळ देऊन डॉ. स्वातीताईंनी भाऊबीज साजरी केली. तुमच्या हक्काच्या बहिणीला कधीही आवाज द्या मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असेही यावेळी डॉ. स्वातीताई म्हणाल्या.

यावेळी वसाडी संरपचपती हुसेन पालकर, उपसरपंच झामसिंग झुलिया, डॉ.संदिप वाकेकर, अशोक पालकर, शंकरनाथ विश्वकर्मा, झहीर मिस्त्री, अजय अग्रवाल , धर्मेंद्र इंगळे, नकलसिह भाटीया, विनोद धंदर, जुनेद शेख, गण्णीभाई, डोगंरसिंग, हरिशचंद्र बिबेकर, प्यारसिंग मुजालड़ा, नारायण कासदेकर, भारत पालकर, श्यामलाल कासदेकर, माणिक चव्हाण, संजय घाटे,अनिल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.