खामगाव तालुक्यातील वाडी येथील सोपान उगलेंना ओळखता का? ही बातमी वाचा..

 
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील वाडी येथील सोपान उगले (४५) हे दिनांक १ ऑक्टोबर पासून बेपत्ता आहेत.

  त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी  खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.  बातमीत प्रकाशित करण्यात आलेला फोटो सोपान उगले यांचाच असून ते कुठे दिसून आल्यास 9764795998 व 9881850546 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.