जास्त गोळ्या नका खाऊ! खामगावात वाचा काय घडल..
Dec 6, 2022, 09:32 IST
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्याऐवजी अनेक जण सरळ मेडिकल चा रस्ता पकडतात. तिथून गोळ्या आणतात, बऱ्याचदा त्याचा फरक पडतोही,मात्र याच गोळ्यांचे सेवन अतिप्रमाणात केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. खामगावात एका महिलेने अती प्रमाणात गोळ्यांचे सेवन केल्याने तिच्यावर मोठे संकट ओढवले. अत्यवस्थ अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
खामगाव तालुक्यातील शिरसगाव देशमुख येथील २७ वर्षीय महिलेने अतिप्रमाणात गोळ्या घेतल्या. लवकर आजारात बरे होण्याचे उद्देशाने तिने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. मात्र याचा परिणाम उलटा झाला. महिलेची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.