विकृती...! दगडाने ठेचून गाय मारली!; जळगाव जामोद तालुक्यातील घटना

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दगडाने मारहाण करून गायीला ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज, २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठला जळगाव जामोद तालुक्यातील डोंगरवेस शिवारात समोर आली. याप्रकरणी शेतकऱ्याने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विजय अर्जुन सुशीर यांनी तक्रार दिली, की त्यांची लाल रंगाची गावरान गाय चालठाणा बुद्रूक शिवारात शेतात बांधलेली होती. आज सकाळी त्यांना गाय मृतावस्थेत दिसून आली. गायीच्या अंगावर दगडाने मारहाण केल्याच्या खुणा होत्या व आजूबाजूला दगड पडलेले होते. तक्रारीवरून पोलिसांनी गायीला मारणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.