रेल्वेच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू; शेगावमधील घटना
Feb 4, 2022, 21:53 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथून नागझरीकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेने ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना आज, ४ फेब्रुवारी रोजी तीनच्या सुमारास समोर आली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शेगाव- नागझरी दरम्यान डाऊन मार्गावरील इंदिरानगरपासून तीन किलोमीटर अंतरावर खंबा नंबर ५४९/१४ ते ५४९/१६ च्या दरम्यान रेल्वेने धडक लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला. अनोळखी व्यक्तीची उंची अंदाजे साडेचार फूट, रंग निमगोरा, सडपातळ बांधा, अंगात निळे शर्ट, पांढरा पायजामा, लाल अंडरपँट अशा वर्णनाच्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन शेगाव रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.