दारूच्या नशेत तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना
Mar 28, 2022, 13:39 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूच्या नशेत तोल गेल्याने विहिरीत पडून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मोताळा तालुक्यातील खरबडी येथे काल, २७ मार्चला रात्री आठच्या सुमारास घडली.
भगवान निकाळजे (४५, रा. खरबडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, निकाळजे यांना दारूचे व्यसन होते. काल संध्याकाळी ते दारू पिऊन घरी आले होते. रात्री आठच्या सुमारास ते घराजवळच्या एका विहिरीवर उभे होते. त्यावेळी तोल गेल्याने ते विहिरीत पडले.
माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली. निकाळजे यांना विहिरीतून बाहेर काढून मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. बोराखेडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नापोकाँ संजय गोरे करीत आहेत.