रडत रडत तिने आईला सांगितले,त्याने माझ्यासोबत...!नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना!

 
rytgjnm
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मुलीची आई घरात नसल्याची संधी साधत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नांदुरा तालुक्यातील माळेगाव गौंड येथे काल, ४ मे रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत संतोष प्रल्हाद चिमकर (३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्या काल, ४ मे रोजी सकाळी घरामागे बकऱ्या सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ११ वर्षीय मुलगी घरात एकटी होती. थोड्या वेळाने त्या घरी परतल्या तेव्हा त्यांना संशयीत आरोपी संतोष चिमकर घरातून बाहेर पडतांना दिसला. मुलीच्या आईने संतोषला काय काम असे विचारला असता मोबाईल नंबर पाहिजे होता असे सांगून तो  घाबरून निघून गेला . त्यावेळी घरात मुलगी रडतांना दिसली.

संतोषने तिला घट्ट पकडले .  तिने आरडाओरड केल्याने तो निघून गेल्याचे  तिने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने नांदुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयीत संतोष प्रल्हाद चिमकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.