मामे भावांनी केला दोन सख्ख्या आतेबहिणीचा विनयभंग! खामगाव तालुक्यातील घटना
Apr 22, 2022, 12:45 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आजीला मारहाण करणाऱ्या मामेभावाला समजावण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या आते बहिणींचा मामेभावांनी विनयभंग केला. ही घटना खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे १९ एप्रिल रोजी घडली. २७ वर्षीय महिलेने २१ एप्रिल रोजी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जावरा येथील २७ वर्षीय महिला तिच्या आजीला भेटण्यासाठी बहिणीसह हिंगणा कारेगावला आली होती. त्यावेळी महिलेचा मामेभाऊ अक्षय गोविंदा जाधव हा आजीला मारहाण करत होता. त्याला समजावत असताना अक्षयने तिला शिविगाळ केली.
त्यानंतर अरविंद यशवंत जाधव, संजय मनोहर जाधव, अशोक साहेबराव जाधव, अक्षय गोविंदा जाधव, अतुल शिवाजी जाधव, लखन शिवाजी जाधव ( सर्व रा. हिंगणा कोरेगाव) या सर्वांनी महिलेचा व तिच्या बहिणीचा वाईट उद्देशाने हात धरला. दोघींच्या गळ्यातील पोत हिसकावली व विनयभंग केला, अशा तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.