मोठीचं लग्न, लहानी गायब!; नांदुरा तालुक्यातील घटना

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या १८ वर्षीय मुलीचे लग्न लागल्यानंतर १४ वर्षीय मुलगी गायब झाली आहे. २३ एप्रिलला या प्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
नांदुरा तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय व्यक्‍तीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलीचे लग्न २१ एप्रिलला लागले. लग्नाची वरात पंगत २३ एप्रिलला होती. सायंकाळपर्यंत १४ वर्षीय मुलगी घरीच होती. मात्र नंतर ती गायब झाल्याचे दिसून आले. तिच्या आई-वडिलांनी, नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला. मात्र ती मिळून आली नाही. तिला कुणीतरी पळवून नेल्याची शक्‍यता तिच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत व्यक्‍त केली आहे.