रेल्वे बोगद्याचे काम सुरू असतांना अंगावरी पडली माती!ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू;नांदुरा तालुक्यातील दुर्दैवी घटना
May 13, 2022, 09:30 IST
नांदुरा: रेल्वे बोगद्याचे काम सुरू असतांना अंगावर अचानक माती पडल्याने ढिगाऱ्याखाली दबून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील आंबोडा शिवारात घडली. काल, १२ मे रोजी ही घटना घडली. या अपघातात मृत्यू झालेला तरुण मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो मजुरी कामासाठी महाराष्ट्रात आला होता.
जितेंद्र केदार वरोले (२१)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील १७ ते १८ मजूर आंबोडा शिवारात रेल्वेगेट क्रमांक २२ जवळ बोगद्याचे काम करीत होते. यावेळी जितेंद्रच्या अंगावर अचानक मोठा मातीचा ढिगारा पडल्याने त्याचा मृत्यू झाला. नांदुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.