शेगाव तालुक्यातील ६७६० शेतकऱ्यांनो केवायसी अपडेट करा! हाती उरला फक्त उद्याचा दिवस; अन्यथा....

 
kisan
शेगाव( संतोष देठे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील ६७६० शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी अपडेट केले नाही. त्यामुळे किसान सन्मान योजनेच्या हप्त्यापासून या शेतकऱ्यांना वंचित रहावे लागू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी योजना म्हणून "पंतप्रधान किसान सन्मान योजना " या योजनेकडे पाहिल्या जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ४ महिन्यातून एकदा २ हजार असे वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. आतापर्यंत या योजनेचे १२ हफ्ते वितरीत करण्यात आले असून पुढील हफ्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले होते. शेगाव तालुक्यातील ६७६० शेतकऱ्यांनी अजूनही हे काम पूर्ण केले नसून ७ स्पटेंबर पर्यंत केवायसी अपडेट करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.