५१ जणांनी लावून घेतला उमेदवारीचा टिळा!

जळगाव जामोदमध्ये संजय गांधी सूतगिरणी निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत!!
 
election
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद येथील संजय गांधी कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी संचालक मंडळाची निवडणूक २३ जानेवारीला होत असून, आज २३ डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विविध ७ मतदारसंघांतून १७ जागांसाठी एकूण ५१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्‍यामुळे निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळाले आहेत. यातून किती उमेदवार अर्ज मागे घेतात यावर पुढील गणित अवलंबून आहे.

कापूस उत्पादक मतदारसंघातून ११ जागांसाठी २९ उमेदवारी अर्ज, बिगर कापूस उत्पादक मतदारसंघ १ जागेसाठी ७ अर्ज, अनुसूचित जाती जमाती मतदार १ जागासाठी संघातून ४ अर्ज, महिला मतदारसंघातून १ जागेसाठी ४ अर्ज, इतर मागासवर्गीय मतदारसंघाच्या १ जागेसाठी ४ अर्ज, भटक्या विमुक्त जाती जमाती १ जागेसाठी ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

उद्या २४ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून, २७ डिसेंबरला वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ आहे. ११ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. २३ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून, मतदानानंतर त्याच दिवशी मतमोजणी झाल्यावर निवडणूक निकाल घोषित करण्यात येणार आहे.