शेगावमधून ३ अट्टल गुन्हेगार हद्दपार!; सहा महिन्यांसाठी जिल्हा बंदी
Mar 3, 2022, 08:46 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन अट्टल गुन्हेगारांना खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सहा महिन्यांसाठी शेगाव शहरातून हद्दपार केले असून, त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.
फिरोज खान नामदार खान (४४, फरशी मस्जिद परिसर, शेगाव), आनंद उर्फ पपल्या रवींद्र गुजर (२४, रा. रोकडियानगर शेगाव, ह. मु. शिवसेना वसाहत, अकोला), चेतन माणिक राऊत (२३, रा. मोदीनगर, शेगाव) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या कारवाया थांबत नसल्याने आणि शहरात दहशत पसरवत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार अनिल गोपाळ यांनी त्यांच्या हद्दीपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानुसार तिघांच्याही हद्दपारीचे आदेश निघाले.