२० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; संग्रामपूर तालुक्यातील धक्कादायक घटना!
Apr 13, 2022, 08:19 IST
संग्रामपूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील वानखेडे येथे १२ एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आली. ज्ञानेश्वर गजानन कुरवाडे ( रा. वानखेड, ता. संग्रामपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मृतक ज्ञानेश्वरचा भाऊ प्रदीप गजानन कुरवाडे हा सकाळी संडासला जात असतांना गावातीलच रामदास शाळकर यांच्या वाड्यातील बाभळीच्या झाडाला ज्ञानेश्वरने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. ते दृश्य पाहून त्याने एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तामगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून ज्ञानेश्वरच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.