…म्हणून रवीना टंडनने घेतली होती सलमान खानसोबत कधीही काम न करण्याची शपथ
Jan 16, 2022, 16:16 IST
प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. रविनाने सलमानसोबत सुरुवातीला काही चित्रपटांत काम केले. पण वाद झाल्याने एकमेकांसोबत काम करायचे नाही, अशी शपथच दोघांनी घेतली. त्यानंतर कधीच ते एकत्र दिसून आले नाहीत.
८० ते ९० च्या दशकात रविवाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. सलमानसोबत काम न करण्याबद्दल रविनाने एका मुलाखतीत सांगितले, की त्यावेळी सलमान आणि माझ्यात नेहमी भांडणे होत होती. एकमेकांना बघितलं तरी आम्हाला संताप व्हायचा. प्रत्येक गोष्टीवरून आमच्यात वाद व्हायचे. कधी कधी भांडण इतके वाढायचे की दिग्दर्शक आमच्यावर नाराज व्हायचे. त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत कामच न करण्याचा निर्णय घेतला.
फूल और पत्थर या चित्रपटात आम्ही एकत्र काम केले होते. अंदाज अपना अपनामध्येही काम केले होते. या चित्रपटात आम्ही एकत्र काम केले पण आमच्यातील भांडणं संपली नव्हती. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान नेहमी भांडायचो. १९९९ मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाची ऑफर मला मिळाली होती. मात्र त्यात सलमान काम करत असल्याने मी नकार दिला, असे रविना म्हणाली.