एकताची नागिन नक्की कोण? कोण आहे ती "म' वाली!

 
file photo
डेली सोप क्विन म्‍हणून जिला ओळखले जाते ती एकता कपूर सध्या अनेकांना कोड्यात टाकून थांबली आहे. तिचा लोकप्रिय शो "नागिन'मध्ये पुढची नागिन कोण असेल याबद्दल तिने कोड्यात टाकणारे उत्तर देऊन उत्‍सुकता वाढवली आहे. "म' अक्षराने नाव सुरू होणारी अभिनेत्री तिच्या शोच्या सहाव्या पर्वात नागिन असेल, असे नुकतेच सांगितले आहे. आजवर या शोचे पाच सिझन झाले आहेत. सहाव्या सिझनची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत.
बिग बॉस १५ च्या विकेंड का वारमध्ये ती पाहुणी म्‍हणून सहभागी झाली होती. यावेळी होस्ट सलमान खानसोबत तिने गप्पा मारली. यावेळीच तिने नागिनच्या सहाव्या सिझनची घोषणा केली आणि नवी नागिन कोण असेल हेही सांगितलं. "म' नावाची हिंट तिने दिल्याने आता "म' अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या अभिनेत्रींचा अंदाज घेतला जात आहे. यातून मौनी रॉय, महिमा मकवाना की महक चहल यांच्याबद्दल प्रामुख्याने चर्चा होताना दिसत आहे. आजवर मौनी रॉय, सुरभी ज्योती, सुरभी चंदना, अनिता हसनंदानी, हिना खान, अदा खान यांनी नागिन भूमिका छोट्या पडद्यावर साकारली आहे. सहावे पर्व जानेवारी २०२२ मध्ये सुरू होणार आहे.